पहा Devendra Fadnavis यांच्या कामाविषयी काय म्हणाल्या पत्नी Amruta Fadnavis
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis (Photo Credits: Instagram)

'महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण?' हा सवाल सध्या संपूर्ण देशाला पडला आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा केला असला तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच फडणवीस सध्या राजकारणात एकटे पडलेले दिसून येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मात्र आपल्या पतीला साथ द्यायची ठरवली आहे.

अमृता यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका भाषणात देवदेनर यांच्या कामाबद्दल वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पडताना 200 टक्के झोकून देऊन काम केलं आहे." इतकाच नव्हे तर, "फडणवीसांच्या कामाची दखल पक्षातल्या वरिष्ठांनीही घेतली. आणि जनतेनेही. त्यामुळे जनतेनेही भाजपला सर्वाधिक संख्याबळ असणारा पक्ष बनवलं. आणि यापुढचीही त्यांची वाटचाल या बाबी लक्षात घेऊनच होईल," असंही त्या म्हणाल्या.

"शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होईल, ही गोड बातमी"- संजय राऊत

राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागून जवळपास 2 आठवडे होत आले आहेत. तरीही सरकार स्थापन झालेले नाही. भाजप आणि शिवसेना यांची महायुती असूनही दोन्ही पक्ष एकत्र सरकार स्थापनेस अंड्यास तरी तयार नाहीत, कारण भाजपला मुख्यमंत्री पद आपल्याकडे ठेवायचे आहे तर शिवसेनेलाही आपलाच मुख्यमंत्री करायचा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेचा अवधी उलटून गेला तर राज्यात राष्ट्रपती राजवट तर लागणार नाही ना अशी भीतीही जनतेच्या मनात आहे.