Mumbai Rain (PC- Twitter)

Mumbai Rain Update: कोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतदेखील शुक्रवारी संध्याकाळी पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस बरसला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या गारव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, शुक्रवारी राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. याशिवाय पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात देखील सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल सध्याकाळी मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सूनने जोरदार बॅटिंग केली. राज्यातील अनेक भागात मान्सून दाखल झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्यामुळे दिलासा मिळाला. (हेही वाचा -Thane: कल्याण-डोंबिवलीतील नाले सफाईचे काम 80% ते 90% पूर्ण, KDMC चा दावा)

पुण्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पोलीस आयुक्तालय आणि पत्रकार भवनसह एकूण 30 ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. शरहात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.

मुंबईकरांनी पहिल्या पावसाचे व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यातील काही व्हिडिओज पहा -

मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला. आता मान्सून तळ-कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यात इतर भागात दाखल होणार आहे.