Water Logging in Mumbai and Thane: मुंबईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे महापालिकेने केलेली मुंबईतील नालेसफाई पहिल्या काही पावसांमध्येच वाहून गेली आहे. परिणामी मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे (Mumbai Waterlogging Videos) आणि वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम पीच असलेल्या ठाणे शहरातही मुंबईसारखीच स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली जागाजोगी उकरुन ठेवलेले खड्डे आणि त्यात पावसाने साचलेले पाणी नागरिकांच्या वैतागात भर घालत आहे. शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याने (Thane Waterlogging Videos) नागरिकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. वाहन चालकांना डोळ्यात तेल घालून वाहने हाकावी लागत आहेत. अनेक ठिकाणेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. खास करुन शहरात अंधेरी सबवे जलमय झाला आहे. धारावी येथेही पाणी साचले आहे. मात्र, आम्ही येथे (धारावी) एक पंपिंग स्टेशन स्थापित केले आहे जे दर तासाला 1,000 घनमीटर पाणी उपसेल," असे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Ambenali Ghat Rock-Slide: आंबेनळी घाटात दरड कोसळली, वाहतूक तात्पूरती बंद)
ट्विट
#WATCH | Maharashtra: Andheri Subway waterlogged in Mumbai as rain continues to lash the city pic.twitter.com/YRfX3RbO2v
— ANI (@ANI) June 28, 2023
मख्यमंत्र्यांचे ठाणे पाण्यात
मुंबईला लागून असलेला जिल्हा म्हणजे ठाणे. या जिल्ह्यातही पावसाची दमदार हजेरी आहे. दरम्यान, ठाणे शहरात पाणी साचले आहे. खास करुन ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमामावर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे स्टेशन पश्चिमेकडील बी'केबिन रस्त्याचा हा व्हिडिओ आहे. जोआपण येथे पाहू शकता.
ट्विट
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging in several parts of Thane, following heavy rainfall pic.twitter.com/Xu1P4XDkgI
— ANI (@ANI) June 28, 2023
दरम्यान, मुंबईत बुधवारी (28 जून) पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अंधेरी आणि कुर्ला सारख्या अनेक ठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक कोंडीही झाली. मुंबई ते कोलकाता ते बेंगळुरू आणि गुजरातच्या काही भागांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने संपूर्ण देश मान्सूनच्या प्रभावाखाली आहे. IMD ने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मुसळधार पावसामुळे भूस्खलन होत असलेल्या हिमाचल प्रदेशात एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.