Photo Credit : X

मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरुन वाहत आहेत.  आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग काढत वाहने व नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणताही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये रुग्णालयात पाणीच पाणी झाल आहे. (हेही वाचा - Pune Weather Forecast For Tomorrow : पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)

पाहा पोस्ट -

ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, येथील ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात एक तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे.

सिंधुदुर्गात उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, उद्या जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पावसाची संततधार सुरूच आहे. गुहागर-चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांचीही कसरत झाल्याच दिसून आलं. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.