Monsoon 2021 Forecast: महाराष्ट्र आणि गोव्याला सतर्कतेचा इशारा, 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
Representational Image. (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील (Maharashtra Rains) विविध जिल्ह्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी रस्ते तुंडुंब भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, महाराष्ट्र आणि गोव्यात येत्या 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. याचबरोबर उत्तर भारतातही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रसह गोव्यातील नागरिकांनी पुढील दोन दिवस अधिक काळजी घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. याचबरोबर केरळ आणि कर्नाटक येथील नागरिकांनाही सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

अखिल भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात आणि गोव्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात येत्या 18 आणि 19 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, याच काळात केरळ आणि कर्नाटकातील काही भागातही पावसाचा वेगात वाढ पाहायला मिळेल, अशीही माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Door-To-Door Covid-19 Vaccination: मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे घरोघरी जावून लसीकरण; BMC ने जारी केला ईमेल आयडी

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे. यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.