Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

मुंबईसह (Mumbai) उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडाटासह (Lightning) पावसाला सुरुवात झाली. उपनगरातही पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे. मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील पावसाचा प्रभाव मुंबईतील ट्राफीकवर (Mumbai Traffic) देखील दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात (Mumbai West Suburban) वांद्रे (Bandra), सांताक्रुज (Santa Cruz), विलेपार्ले (Ville Parle), अंधेरी (Andheri), गोरेगाव (Goregaon), मालाड (Malad), कांदिवली (Kandivali), बोरिवली (Borivali) परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे नाशिक घाट भागात पुढील 3.4 तासांत मधूनमधून तीव्र सरीसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता  हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

महाराष्ट्राप्रमाणेच (Maharashtra) छत्तीसगढ (Chhattisgarh) आणि मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार कोकणात (Konkan)  परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात (Vidarbha) पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनचं अमरावती (Amravati), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळमध्ये (Yavatmal) जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. (हे ही वाचा:- Mumbai: तरुणाच्या गाडीला अचानक आग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा, प्रशासनाला दिले मदतीचे आदेश)

 

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात (Maharashtra) पुन्हा पावसाने कमबॅक (Come Back) केलं आहे. मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाची जोरदार बॅटींग (Bating) बघायला मिळत आहे. तरी नदीकाठच्या गावांना विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर कोकणातील काही भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.