मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनाचा ताफा विलेपार्ले येथून घरनी निघाला होता. दरम्यान, वेलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:च्या वाहनातून पावसात खाली उतरले आणि त्यांनी विचारपूस करुन प्रशासनाला संबंधित तरुणाला मदत करण्याच्या सूचना दिल्या.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. याचवेळी विमानतळावरून घरी जाताना हे दृश्य पाहून पावसात खाली उतरत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला त्या तरुणाला मदत करण्याचे आदेश दिले. pic.twitter.com/iOL9eI02yU
— News18Lokmat (@News18lokmat) September 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)