![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/01/1-41.jpg?width=380&height=214)
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील एका 32 वर्षीय महिलेला 2.47 लाखांचा गंडा लावून तरुण फरार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेकडून आरोपीने पैसे घेतले होते. पीडितेला फसवणूक झाल्याची लक्षात येताच, या घटनेची माहिती खारघर पोलिसांना दिली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.पीडित खारघर येथील रहिवासी आहे. आरोपी आणि पीडित महिलेची ओळख एका मॅटिमोनियल साइटवर झाली. (हेही वाचा-धडाधड झाडल्या गोळ्या, सिनेस्टाईल पाटलाग; एटीएम लुटणारी टोळी तामिळनाडू पोलिसांकडून जेरबंद, एकाचा जागीच मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून फसवा अभियंता महिलेकडून 2.47 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. शशिधर दिलीप कुमार जेरे असं आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडितेची ओळख एप्रिलपासून झाली होती. आरोपीने महिलेला वाशीतील एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावले होते. शशिधरने यांने महिलेला सांगितले की, तो बंगळुरू येथील इंजिनीअर आहे. त्याला बिजनेस करणार असल्याने त्याला काही आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
शशिधरने महिलेकडून 2.47 लाख रुपये घेतले. त्याने पैसे लवकर परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने तिला 20 लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज करण्यात सांगितले. तीनं आणखी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शशिधरने तीच्याशी बोलणे टाळले. तीला फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच, तीनं खारघर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपीच्या शोधात आहे.