पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्येच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनीही आक्रमक भुमिका घेतली आहे. याप्रकरणातील आरोपीला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत. तसेच उपचाराअंती तो आरोपी वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोनाबाधित आणि कोरोना संशयितांना इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. मात्र, या सेंटरमध्ये एका महिलेचा बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणातील आरोपी आणि पीडिता या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याची समजत आहे. या घटनेवर शलिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्राया दिली आहे. “पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला रुग्णावर एका पुरूष रुग्णाने बलात्कार केला. यावरून महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झाले आहे, अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा. त्यातूनही तो वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी. बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाही,” असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- धक्कादायक! नाशिक मध्ये आईला कोरोनाची लागण झाल्याने 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या
शालिनी ठाकरे यांचे ट्विट-
@DGPMaharashtra @mnsadhikrut @LoksattaLive @zee24taasnews @abpmajhatv @ANI @MiLOKMAT @News18lokmat @SakalMediaNews @aajtak @ndtv @GajananKaleMNS @KirtikumrShinde @anilshidore @News18India @ndtvindia pic.twitter.com/spiMGzhnHB
— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 18, 2020
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा करोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतायत कसे ? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते?, असा पश्न सवाल चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेच जबाबदार आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’चे काय झाले की ती फक्त घोषणा होती, अशी विचारणाही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला केली आहे.