
राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या विरोधात लढण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा सण सुद्धा यंदाच्या वर्षात मोठ्या थाटामाटात कोरोना व्हायरसमुळे साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नियम आणि अटी गणेश मंडळांसह घरगुतील गणपतींसाठी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. याच दरम्यान आता ठाणे महापालिकेने सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.
तर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्रात राहात असलेल्या नागरिकांना श्री गणेशाच्या विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रीम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसरेजनायाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. तसेच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून महापालिकेने तयार केलेल्या या फिरत्या विजर्सन व्यवस्थेतंर्गत श्री गणेशाचे कृत्रीम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधीवत विसर्जन करण्यात येते त्याच पध्दतीने श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे.(Ganpati Special Trains: गुजरात हुन कोकणासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे सोडणार गणपती स्पेशल ट्रेन, तिकिट बुकिंगची वेळ, तारिख जाणुन घ्या)
महापालिकेच्या तीन परिमंडळांमध्ये तीन वाहनांव्दारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली फिरती विसर्जन व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्यावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असून त्यासाठी कृत्रीम तलावासोबतच स्विकृती केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिजी ठाणे प्रणालीव्दारे गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकींग योजनाही राबविण्यात येत आहे.