Monsoon 2021: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील परिस्थितीचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा
Eknath Shinde (Photo Credits: Twitter)

आज मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामीण विभागातील मान्सूनपूर्व कामांच्या तयारीचाआढावा घेतला. त्याचबरोबर प्रशासनाला इतर महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (Monsoon 2021: मुंबई, ठाणे, पालघर मध्ये आजपासून मान्सून, महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पुढील 2, 3 दिवसांत मान्सून बरसण्यास पोषक वातावरण; IMD ची माहिती)

धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे, अतिधोकादायक इमारती तातडीने पाडणे, आपत्तीजनक परिस्थिती हाताळण्यासाठी NDRF व TDRF धर्तीवर तातडीने रेस्क्यू पथक तैनात करणे आणि कोविड रुग्णालयांचा वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे ट्विट्स:

 

त्याचबरोबर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने सखल भागात पंप तैनात करण्यासोबतच टीडीआरएफची पथके तैनात करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.

यावेळी महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपिन शर्मा तसंच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 108 आणि हेल्पलाईन क्रमांक 022 25371010 वर संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.