Mumbai Local Ladies Special (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या ( Coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबई लोकल (Mumbai Local) बंद करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो, असे चित्र प्रसारमाध्यमांतून आज दिवसभर रंगवले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मात्र प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Shaikh) यांनी सांगितले की, सध्यास्थितीत तरी मुंबई लोकल बंद करण्यात येणार नाही. मात्र, गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येईल असेही शेख यांनी सांगितले.

वृत्तवाहिण्यांच्या प्रतिनिधींनी आज प्रदीर्घ काळ अनेक मुंबईकरांची मतं जाणून घेतली. बहुतांश मुंबईकरांनी काही झाले तरी मुंबई लोकल बंद करु नये अशाच पद्धतीचे मत व्यक्त केले. काही तुरळक मुंबईकर मुंबई लोकल काही काळ बंद केल्यास कोरना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकेल असे मत व्यक्त केले. (हेही वाचा, Coronavirus: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबई लोकलही सुरु राहणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रसारमाध्यमांना माहिती देतना मुंबई लोकल बंद होणार नाही. तसेच, राज्य कर्मचाऱ्यांना सुट्टीही दिलेली नाही, असे सांगितले. राज्यातील जनता जाणकार आहे. ती स्वत:हून राज्य सरकारला सहकार्य करेन. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागणार नाहीत, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. दरम्यान, जनतेने सहकार्य केले नाही. सूचनांचा विचार केला नाही तर, मात्र सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.

Coronavirus Outbreak In Maharashtra: महाराष्ट्रात मेडिकल,रेल्वे,मंदिरं नेमकं काय राहणार सुरू आणि बंद ? :  Watch Video 

दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संक्रमीत रुग्णांची आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत 126 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संक्रमण झाले आहे. हिच संख्या काल 114 इतती होती. देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार कोरोना व्हयारस नियंत्रणासाठी अधिक गंभीर आहे.