Voter ID Representational Image (Photo Credits: IANS)

Navi Mumbai: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Konkan Division Teacher Constituency Election) सोमवार, 30 जानेवारी रोजी होणार आहे. मात्र, मतदार यादीत बोगस नावे (Bogus Names) असल्याच्या तक्रारीनंतर पनवेल पंचायत समितीच्या (Panvel Panchayat Samiti) गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (Group Education Officer) 28 जानेवारी रोजी पाच शाळांना नोटीस बजावली आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत (Voters' List) मोठ्या प्रमाणात बोगस आणि डुप्लिकेट नावांचा समावेश झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.आर.मोहीते यांनी नोटीस बजावली आहे. (हेही वाचा - Sanjay Shirsat Statement: तिन्ही पक्ष आणि व्हीबीए यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत, संजय शिरसाट यांची टीका)

पंचायत समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण मतदार नोंदणी अर्ज आणि विहित नमुन्यात योग्य प्रमाणपत्र देणे ही संबंधित मुख्याध्यापक, मुख्याध्यापक/संस्थेचे प्रमुख यांची जबाबदारी होती. मात्र, या पाच शाळांनी ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नसल्याने कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणुकीकरिता सोमवारी म्हणजेच उद्या मतदान होणार असून, गुरुवारी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ यांनी दिली आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे जिल्हे समाविष्ट आहेत.