Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (19 सप्टेंबर) पार पडत आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यापैकी 547 ग्रामपंचायतीचा आज निकाल आहे. त्यातही जवळपास 51 ग्रामपंचायती आगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि सरपंच अशा दोन्हीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडते आहे. सकाळी दहा वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा कौल काय आहे हे या निकालानंतर कळण्यास मदत होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींसाठी मतदान?
राज्यातील 16 जिल्ह्यांपैकी 608 ग्रामपंचायत आणि थेट सरपंच पद निवडीसाठीही मतदान झाले. त्यातील जिल्हानिहाय तालुके आणि त्यातील ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे: नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75, धुळे: शिरपूर- 33, जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02, बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02, अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01, वाशीम: कारंजा- 04, अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01 ,यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08, नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01, हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04, नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17, पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02, अहमदनगर: अकोले- 45, लातूर: अहमदपूर- 01, सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08, कोल्हापूर: कागल- 01 इत्यादी. (हेही वाचा, Gram Panchayat Election 2022: राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, उद्या 19 सप्टेंबरला मतमोजणी)
राज्यात सत्तांतर झाल्याने पुन्हा एकदा थेट जनतेतूनच सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची पसंती आणि प्रतिसाद कसा मिळतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. अनेक ठिकाणी या आधी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य वेगळ्या गटाचे आणि सरपंच वेगळ्या गटाचा झाला आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी आल्याचेही पाहायला मिळाले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. त्यामुळे नेमका कोणता पक्ष सत्तेवर आला आहे हे अधिकृत सांगता येत नसले तरी, या निवडणुकांमध्ये सहभागी होणारे गट हे राजकीयच असतात. त्यामुळे कोणत्या विचारांच्या गटाल यश मिळाले यावर ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता याबातबअंदाज बांधला जातो.