दहीहंडी उत्सव (Photo Credits-Twitter)

दहीहंडी (Dahi Handi) उत्सवासाठी मुंबईतील सर्व गोविंदापथक सज्ज झाले असून त्यांचा सरावही आता अंतिम टप्प्यात आला आहे. दहिहंडी लावताना गोविंदा पथके कोसळतात, त्यात त्यांना गंभीर दुखापत होते, तर अनेकदा कित्येकांना जीवही गमवावा लागतो. हे प्रमाण गेल्या काही वर्षापासून वाढल्या कारणाने शासनाने थरांच्या उंचीवर बरेच निर्बंध लादले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षीपासून हा उत्साह कमी पाहायला मिळाला. मात्र दहीहंडी साजरा करणे कोणीही सोडणार नाही. त्याचाच विचार करता प्रभादेवीतील महेश सावंत यांचे दहीहंडी मंडळ आणि ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानात गिर्यारोहक (Climber) पथके गोविंदापथकांना सुरक्षा देणार आहे.

लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकर कपिलेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी येथील महेश सावंत आणि ठाणे स्वामी प्रतिष्ठानात ही पथके कार्यरत असणार आहे. हे ठेवण्यामागचा उद्देश म्हणजे थर लावत असताना कधी कधी गोविंदांनी लावलेला मनोरा कोसळतो अशा वेळी सर्वात वरच्या थराला असलेला खाली न पडता या गिर्यारोहकांच्या साहाय्याने बिले तंत्राचा वापर करुन वरच्या वर उचलून धरला जाईल. ज्यामुळे वरच्या थरातील गोविंदाला गंभीर दुखापत होणार नाही. (हेही वाचा: Thane Dahi Handi 2019: दही हंडी निमित्त डॉ. काशिनाथ नाट्यगृह चौकातील वाहतूक मार्गात बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग)

दहीहंडी सणाचा गोविंदा पथकांना तसेच ते पाहणा-या लोकांनाही मनमुराद आनंद घेता यावा, या उत्सवात अपघात होऊन या सणाला कसलेही गालबोट लागू नये आणि गोविंदा पथकांच्या आनंदावर विरजण पडू नये यासाठी आम्ही ही उपक्रम राबवित असल्याचे गोविंदा ज्येष्ठ गिर्यारोहक रत्नाकरांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

त्यासोबतच हा उपक्रम जास्तीत जास्त दहीहंडी आयोजित करणा-या मंडळात राबविण्यात यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.