Bhagat Singh Koshyari | (Photo Credit : ANI)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी वेळवेळी टीका होऊनही आपली वादग्रस्त वक्तव्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. आताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो आहे. महाविकासआघाडीतील घटक पक्ष आणि सर्वच स्तरातून राज्यपालांचा निषेध होतो आहे. अनेक ठिकाणी राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत. तर काही ठिकाणी राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला जात आहे. नाशिक येथे तर चक्क धोतर (Nashik) जाळून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.

राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्ध अनेक ठिकाणी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला जात आहे. राज्यपालांनी तातडीने जनतेची माफी मागावी अशी मागणीही जोरदारपणे होऊ लागली आहे. राज्यपालभगत सिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे नेत छत्रपती शिवाजी महाराज यांची वारंवार बदनामी करत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचाच अपमान होतो आहे. त्यामुळे राज्यपालांना परत बोलूवन केंद्र सरकारेन महाराष्ट्रातून त्यांची पदावरुन हकालपट्टी करावी अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Bhagat Singh Koshyari Controversial Statement: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”)

राज्यपालांच्या आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने केलेल्या विधानावरुन राज्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्याचया मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करायला हवे. पण, अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. राज्याचा होणारा अपमान पाहूनही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गप्प बसत असतील तर अशा सरकार वर महाराष्ट्र थुंकतो आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याबाबत तीव्र भावना व्यक्त केली आहे. आजवर खूप सहन केले. आता बोलण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या दैवतांबद्दलच अशी भावना व्यक्तच कशी केली जाऊ शकते. तेसुद्धा राज्यपाल पदासारख्या संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून. याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे. केंद्र सरकारने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवावे, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.