Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: ANI)

विधानसभेत आज झालेल्या विशेष अधिवेशनात ब-याच घडामोडी घडल्या. सर्वात आधी विधानसभा अध्यक्ष पदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची निवड झाली. या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील अन्य नेत्यांनी नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या भाषणामधून अभिनंदन केले. त्यानंतर संध्याकाळी 4.00 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी अभिभाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगितले.

ज्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आरक्षणााचा विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन दिले. या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यपालांनी हे भाषण मराठीतून केले. यावेळी त्यांनी अवकाळी पावासामुळे झालेल्या आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीवेळी शेतक-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी शेतक-यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. ठाकरे कुटुंबाचे नवे घर 'मातोश्री 2' बांधून तयार; जाणून घ्या या 8 मजली इमारतीची वैशिष्ट्ये

बेरोजगारांना नोक-या उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न होतील. भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या अभिभाषणात सांगितले.

मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन आदि योजना राबविण्यात येतील, तसेच परवडण्यायोग्य वैद्यकिय उपचार मिळविण्यासाठी रुग्णालये, महाविद्यालये देखील निर्माण केले जातील असेही त्यांनी सांगितले.