Nana Patole, Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना मिरकरवाडा बंदरात आढवा घेतला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारकडे (Maharashtra Government) महत्वाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही केली तरी, राज्य सरकारने या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना भरीव मदत करा, असे आवाहन नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यावर असता आज रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी जाऊन मच्छीमारांची व विविध नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली व समस्या ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणातील नागरिकांना बसला आहे. त्यांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. केंद्र सरकारकडून मदत आली पाहिजे हा आमचा अधिकार आहे. या वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना केंद्राने मदत नाही केली तर, राज्य सरकारने कोकणवासियांना भरीव मदत करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारला कर्ज घेण्याची गरज पडली तरी घ्या पण नुकसानग्रस्तांना मदत करा, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra COVID19 Update: महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 26,672 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 594 जणांचा बळी

ट्विट-

तसेच, तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गुजरात येथील नागरिकांचेही नुकसान झाले आहे. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला 1 हजार कोटींची मदत जाहीर केली होती. यावेळी पंतप्रधान महाराष्ट्रालाही 2 हजार कोटींची मदत करतील असे वाटत होते. परंतु, केंद्राकडून महाराष्ट्राला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचे आहेत का? असाही सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.