Woman (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्रामध्ये आता अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika) मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात अंगणवाडी सेविकांना आता सेवानिवृत्तीचा लाभ (Retirement Benefits) तात्काळ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ ताबडतोब मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सूचना केली होती. या सूचनेला महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणण्याचा निर्णय झाला आहे. ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या निर्णयाच्या अंमलबजावणीचे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. Nandurbar: कौतुकास्पद! अंगणवाडी सेविका Relu Vasave आदिवासी मुलं व गर्भवती स्त्रियांना पोषक आहार पुरवण्यासाठी दररोज 18 किमी बोट चालवून जातात दुर्गम भागात; पहा फोटो.

 

महाराष्ट्र राज्यात 10,8005 अंगणवाड्या/ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. राज्यात 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत. , ज्यामध्ये 4000 पेक्षा जास्त पर्यवेक्षक आणि अंदाजे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस आणि छोट्या अंगणवाडीमधील कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते संपुर्ण आईसीडीएस प्रकल्प निम्नस्तरापासून चालवत आहेत.

अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. अंगणवाडी सेविका गरोदर महिला, बालकांच्या आरोग्यासाठी, कुपोषणासारख्या समस्यांना दूर करण्यासाठी काम करत असतात. कोविड 19 संकटामध्येही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

एलआयसीमार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची 65 वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर  एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा , सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या सेविकांच्या वारसदारांसही एवढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 75 हजार रु. रक्कम देण्यात येणार आहे.