Nandurbar: कौतुकास्पद! अंगणवाडी सेविका Relu Vasave आदिवासी मुलं व गर्भवती स्त्रियांना पोषक आहार पुरवण्यासाठी दररोज 18 किमी बोट चालवून जातात दुर्गम भागात; पहा फोटो
Anganwadi worker Relu Vasave (PC - ANI)

Nandurbar: महाराष्ट्रातील नंदुरबार (Nandurbar) येथील अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) रेलू वसावे (Relu Vasave) 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आणि गर्भवती असलेल्या स्त्रियांसाठी दररोज 18 किलोमीटर बोट चालवून तेथील दुर्गम भागात पोहोचते. रेलू म्हणते की, "दररोज इतक्या लांब बोट चालवून जाणं कठीण आहे, परंतु मुले आणि गर्भवती स्त्रियांना पौष्टिक आहार मिळणही महत्वाचे आहे." सध्या सर्वत्र रेलू यांच्या कार्याचं कौतुक होत आहे.

दरम्यान, 27 वर्षीय रेलू वसावे स्वतः दोन मुलांची आई आहे. ती दररोज 18 किलोमीटर बोट चालवून आदिवासी गावांमध्ये जाते. तेथील सहा वर्षांखालील मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना पोषक आहाराचे वाटप करते. आदिवासी मुलांचे आणि गर्भवती स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहावे, हा यामागचा उद्देश असल्याचंही रेलू यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -  महाराष्ट्र: वाढीव वीज बिलवाढीविरोधात आज भाजपचे राज्यव्यापी आंदोलन, मनसेकडून दादर मध्ये पोस्टर लावून आक्रमक आंदोलनाचे संकेत)

दुर्गम भागातील गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे रेलू यांनी आदिवासी मुले व गर्भवती महिलांकडे जाण्यासाठी नावेतून जाण्याचा निर्णय घेतला. रेलू यांनी सांगितलं की, सहसा आदिवासी महिला, गर्भवती स्त्रिया आणि मुले आपल्या कुटुंबियांसमवेत आमच्या केंद्रात येत असतं. परंतु, कोरोनाच्या भीतीने ते आता केंद्रात येत नाहीत. त्यामुळे मी स्वत: मुले व गर्भवती स्त्रियांना त्यांच्या घरी जाऊन पोषक आहाराचे वाटप करण्याचा निर्णय घेतला.