Gondia police recovered IED explosives

गोंदियामध्ये पोलिसांना एका सर्च ऑपरेशनमध्ये IED चा साठा, डेटोनेटर (detonator),वायर आणि बॅटरी सापडली आहे, दरम्यान सालेकसा तहसील गावामध्ये Murkutdoh-Sonegaon येथे नक्षलवाद्यांनी हा प्लान्ट केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गोंदिया हानक्षलवादी भाग आहे. मात्र असे असूनही गडचिरोली इतका प्रभाव या जिल्ह्यामध्ये पहायला मिळत नाही. परंतू वर्षभरापूर्वीदेखील गोंदियामध्ये अशाप्रकारेच 10 किलो आईडी जप्त करण्यात आला होता.

गोंदिया मध्ये पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीसांची कारवाई केली आहे. यामुळे गोंदियातील नक्षलवाद्यांनी धनेगांव ते मुरकुटडोह रोडवर पेरुन ठेवलेले विस्फोटक काल (11 ऑगस्ट) निकामी करण्यात आले आहे. यामुळे मोठा घातपात टाळण्यास मदत झाली आहे.

ANI Tweet

दरम्यान नक्सलसेललामाहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. यामध्ये घातक विस्फोटक जप्त करण्यात आली आहेत. हा पोलिसांना उडवण्यासआठी आखलेला एक घातपात होता मात्र वेळीच गुप्तखात्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधारे पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली आणि मोठा कट उधळला आहे.

काही वर्षांपूर्वी गडचिरोलीमध्ये 1 मे महाराष्ट्रदिनी असाच नक्षलवाद्यांनी पोलिसांची व्हॅन उडवून लावली होती.