धक्कादायक! चिमुकलीच्या खाऊसाठी बायकोने 5 रुपये मागितल्याने चक्क नवऱ्याने घेतला मुलीचा जीव
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

महाराष्ट्रातील गोंदिया (Gondia) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर एका महिलेने नवऱ्याकडे आपल्या 20 महिन्यांच्या चिमुकलीसाठी खाऊसाठी 5 रुपये मागितले. पण नवऱ्याने आपल्या मुलीसाठी पैसे देण्याऐवजी तिलाच संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 28 वर्शीय विवेक उके याला अटक करण्यात आली आहे.(Ulhasnagar Murder: धक्कादायक! 400 रुपयांसाठी मित्राची हत्या; उल्हासनगरमधील घटना)

गोंदिया मधील लोनारा गावातील ही घटना असून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुलगी खाजा हवा होता म्हणून रडत होती आणि तिने आईला त्याबद्दल सांगितले. त्यामुळे महिलेने तिच्या नवऱ्याकडे 5 रुपये खाजा खरेदीसाठी मागितले. पण नवऱ्याने चिमुकलीवर संताप व्यक्त करत तिचे डोके दरवाज्यावर वारंवार आपटले. या प्रकारामुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्या डोक्याला जबरदस्त दुखापत सुद्धा झाल्याचे दिसून आले आहे.(Solapur: सोलापूरच्या माळशिरस येथे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू; संतापलेल्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड) 

या प्रकरणी महिलेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला असता आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच नवऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उके याचे 2018 मध्ये लग्न झाले होते. त्यावेळी दारु पिऊन बायकोला मारहणा करत असल्याने ती घर सोडून गेली होती. पण 2019 मध्ये ती परत आपल्या घरी परतली होती.

दरम्यान, नुकत्याच मुंबईतील एका विशेष POCSCO कोर्टाने शुक्रवारी 58 वर्षीय व्यक्तीने 2018 मध्ये पाच वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाच मुलांचा बाप असणारा व्यक्ती त्या 5 वर्षाच्या मुलाच्या परिसरात चिकनची विक्री करत होता. 4 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता त्यावेळी त्याला 2 रुपये या व्यक्तीने दिले आणि आपल्या घरी घेऊन आला. मुलाला घरी आणल्यानंतर त्याने त्याचे कपडे काढून त्याच्या समोर मास्टरबेशन केल्याचा प्रकार घडला होता.