सोने आणि चांदी (Gold, Silver Rates Today) हे भारतीय नागरिकांसाठी नेहमीच आदर आणि गुंतवणूक, बचत यांसाठीचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. खास करुन सांस्कृतिकदृष्ट्याही भारतामध्ये सोने आणि चांदी (Gold Silver Rate) महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या धातूंच्या दररोज बदलाणाऱ्या किमती नेहमीच उत्सुकतेचा विषय राहतो. आज सोने-चांदी दर काय? असा साधारण प्रश्न अनेक लोक परस्परांना विचारत असतात. लोकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन आम्ही येथे आजचे सोने आणि चांदी धातूचे दर देत आहोत. अर्थात हे दर कोणत्याही करांशिवाय दिले आहेत. त्यामुळे यात स्थानिक कर, जीएसटी लावले असता त्यात बदल संभवतो. त्यामुळे वाचकांनी येथील घर हे निव्वळ मूळ दर म्हणून त्याकडे पाहावे.
भारतात आज म्हणजेच 30 मार्च रोजीचा प्रति एक ग्रॅम 22 कॅरेट सोने दर 6,290 रुपये इतका आहे. तर प्रति एक ग्रॅम 24 कॅरेट सोने दर 6,860 रुपये इतका आहे. भारतात सोने खरेदी विक्री खास करुन तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम यामध्ये अधिक केली जाते. त्यामुळे अनेकांना प्रति तोळा दरांबाबत उत्सुकता आसते. आज एक तोळा (प्रति 10 ग्रॅम) 22 कॅरेट सोने 62,900 रुपये तर, तेवढ्याच वजनाचे 24 कॅरेट सोने 63, 150 रुपये दराने विकले जात आहे. दुसऱ्या बाजूला चांदी दरात किंचीत तेजी पाहायला मिळत आहे. भारतात 10 ग्रॅम चांदी 780 रुपयांनी विकली जात आहे. जी काल (29 मार्च) रोजी 778 रुपयांनी विकली जात होती. म्हणजेच चांदी दरात आज प्रति दहा ग्रॅम मागे दोन रुपयांचा फरक जाणवतो आहे. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा विचार करता सोने दर खालील प्रमाणे
मुंबई
22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 62, 750 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 68, 450 रुपये
पुणे
22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 62, 750 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 68, 450 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 62, 750 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 68, 450 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 62, 780 रुपये
24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम- 68, 480 रुपये
सोने दरात आज काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळते. या आधी बाजार बंद झाला त्या तुलनेत आज सकाळी सराफा बाजार सुरु झाला तेव्हा 1 ग्रॅम सोने 25 रुपयांनी, 10 ग्रॅम सोने 200 रुपयांनी तर एक तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोने हे 250 रुपयांनी घटल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
भारतामध्ये चांदी प्रति 10 ग्रॅम 780 रुपयांना विकली जात आहे. प्रति 100 ग्रॅम 7,800 रुपये तर प्रति 1 किलो चांदी 78,000 रुपयांना विकली जात आहे.