Gold Rate Today: आज सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, पहा आजचा भाव!
Gold & Sliver Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारताचा केंद्रीय अर्थसंकल्पाचं शेअर मार्केटने स्वागत केल्यानंतर सोन्याच्या भावांवरही (Gold Rate) त्याचा परिणाम झाला आहे. त्यामध्येच आता कस्टम ड्युटी कमी झाल्याने सोन्याचे दर घसरले होते. कालच्या वाढीनंतर आता आज पुन्हा सोन्याचे भाव उतरले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या वायदा भाव 350 रूपयांनी घसरून 47,400 वर ट्रेड करत आहे तर चांदी 67,729 रूपयांवर पोहचली आहे. त्यामुळे सध्या लग्न सराईचा मोसम पाहता आता कमी होणारे सोन्याचे भाव पाहून अनेकांनी या संधीचं सोनं करत खरेदीलाही पसंती दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी कमी केल्याने अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराताही सोन्याचे भाव खाली आले आहे. अमेरिकेत सोनं 10.89 डॉलरच्या घसरणी सह 1823.34 डॉलर प्रति औंस अशा दरात आहे. तर चांदी 0.30 डॉलरच्या घसरणीसह 26.5 डॉलरवर बाजार करत आहे. LPG Gas Cylinder: विना अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आता किती पैसे मोजावे लागणार.

मुंबई मधील आजचे सोन्या-चांदीचे भाव काय?

Good Returns च्या माहितीनुसार, मुंबई मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर ₹49,010 आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹48,010 आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ₹68,500 आहे. चांदी कालच्या दराच्या तुलनेत आज 500 रूपयांनी कमी झाली आहे.

दरम्यान अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युडी कमी झाली असली तरीही अर्थमंत्र्यांनी सोन्यावर, चांदीवर 2.5% अधिभार लावणार असल्याची माहिती दिली आहे. पण प्रामुख्याने हा फायदा सोनारांना आहे पण सोनार हा फायदा ग्राहकांपर्यंत कसा पोहचवणार यावर ग्राहकांसाठी सोनं किती व कसं स्वस्त होणार हे अवलंबून असेल.