Gold Rate Today: सोन्याला झळाली, पहा आजचा सराफा बाजारातील दर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून ग्राहकांची पावले सोनाराच्या दुकानाकडे वळत आहेत. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज मुंबईतील सराफा बाजारातील सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅमसाठी आजचा दर 39,880 रुपये झाला आहे. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने किंमतीत सुद्धा वाढ झाली आहे.

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. रुपयाच्या दरात घसरण झाली की लोक सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात.जागतिक बाजारात डॉलरमध्ये चढउतार झाले की सोन्याच्या दरातही बदल झालेला पाहायला मिळतो.(Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

 तर सरकार नोटबंदी सारख्याच एका मोठ्या निर्णयाची घोषणा लवकरच करणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इनकम टॅक्सच्या एमनेस्टी स्कीम अंतर्गत सोन्यासाठी एमनेस्टी स्किम (Amnesty Scheme) येण्याची शक्यता आहे. एका विशिष्ट मर्यादेच्या वरील पावतीशिवाय ठेवण्यात आलेल्या सोन्याची किंमतीसह संपूर्ण माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. त्याचसोबत खरेदी केलेले सोने बनावट तर नाही ना हे तपासायचे कसे असा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यावर सरकारने एक नवा नियम लागू करणार आहे. या नव्या नियमामुळे बनावट सोने विक्रीवर आळा घालून फक्त शुद्ध सोनेच बाजारात विक्रीस उपलब्ध होणार आहे.भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ही देशातील एकमेव एजन्सी आहे ज्यांना सोन्याचे दागिने हॉलमार्किंगला मान्यता आहे. आता नव्या नियमानुसार 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असं सोन्यासाठी हॉलमार्किंग निश्चित करण्यात आलं आहे.