आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. आतापर्यंतचा सोन्याच्या दराच्या इतिहासातील उच्चांकी वाढ असून आजचा सोन्याचा दर 50,020 रुपये प्रति तोळा इतका पोहचला आहे. काल सोन्याचा दर हा 49,527 रुपये प्रति तोळा इतका होता. एका दिवसात सोन्याचा दर 533 रुपयांनी वाढल्याने 50 हजारांचा आकडा पार केला आहे. दरम्यान चांदीचा दर 60,990 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. कोरोना व्हायरस संकटाचा फटका सोने खरेदीवर झाल्यावर सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1.3% वाढला असून 1,865.81 डॉलर प्रतीऔंस इतका झाला आहे. गेल्या 9 वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे. त्याचबरोबर चांदीचे दरात देखील वाढ झाली आहे. या आधीच्या चांदीच्या किंमतीत 6.6% म्हणजेच 3400 रुपये प्रति किलो वाढ झाली असून चांदीचा दर 61,130 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. सोन्याच्या दराने 50 हजारांचा टप्पा पार केल्याने पाहुया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये काय आहेत आजचे सोन्याचे दर. हे सोन्याचे दर goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आले आहेत.
आजचा सोन्याचा दर:
शहर |
24 करेट/प्रतितोळा |
22 करेट/प्रतितोळा |
मुंबई | 48,961 रुपये |
47,961 रुपये |
पुणे |
50,260 रुपये |
47,830 रुपये |
नाशिक |
50,247 रुपये |
47,857 रुपये |
नागपूर |
50,228 रुपये |
47,858 रुपये |
सोलापूर |
50,200 रुपये |
47,820 रुपये |
कोल्हापूर |
50,218 रुपये |
47,878 रुपये |
दरम्यान कोरोना व्हायरस संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाथितांचा आकडा 1192915 वर पोहचला असून 411133 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 753050 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान एकूण 28732 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.