Gold Price on Dussehra 2019: दसऱ्याच्या शुभदिनी जाणून घ्या सोन्याचे मुंबई, नागपूर आणि पुणे येथील आजचे दर
Gold | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Gold Rate On Dussehra 2019: आज साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दसरा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. याच मंगलदिनाचे औचित्य साधून लोक सोने खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार पहायला मिळाली आहे. त्यामुळे काही जण सोने खरेदी करण्याचा विचार करतात. पण आज शुभदिन असल्याने ग्राहक आवर्जुन सोने खरेदी करतात. तर आजही सोन्याचे दर वाढले असून 38 हजारांवर पोहचले आहेत.

आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे.दसराचा मुहूर्त हा साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्याने यादिवशी कोणत्याच शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी विशेष मुहूर्ताची वेळ पहाण्याची गरज नसते. सोनं विकत घेताना त्याची शुद्धता तपासून घ्या.हॉलमार्कचे दागिने, त्याचा स्टॅम्प आणि पक्क बिल घेऊनच दागिने विकत घ्या. तर जाणून घ्या आज मुंबई, नागपूर आणि पुणे येथील सोन्याचे दर.(Dussehra 2019: दसर्‍याच्या पूजेत आवश्यक 'सरस्वती चिन्ह' पाटीवर ते रांगोळीच्या स्वरूपात कसं रेखाटाल? Watch Video)

>>मुंबईतील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>पुणे येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>नागपूर/नाशिक येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 37,300 ₹

24 कॅरेट सोने: 38,300 ₹

>>हैदराबाद येथील सोन्याचे आजचे दर:

22 कॅरेट सोने: 36,480 ₹

24 कॅरेट सोने: 39,790 ₹

सर्वसाधारणपणे पाहायचे तर कोणतीही वस्तू स्वस्तात उपलब्ध असते तेव्हा लोक ती मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. परंतू, सराफा बाजारात काहीसे या उलट पाहायला मिळते. सर्वसामान्य बाजारपेठेचा नियम इथे लागू पडत नाही. इथे सोनं महाग होणार अशी शक्यता दिसली की लोक खरेदीसाठी अधिक घाई करतात. मात्र, अतिमहागाईचा नाही म्हटले तरी सराफा बाजारातील व्यवहारावर परिणाम झालेला पाहायला मिळते.