Photo Credit : Unsplash

वाढत्या महागाईचा अजून एक फटका आज सर्वसामान्यांना बसला आहे. आजपासून गोकुळचे दूध पुन्हा महाग (Gokul Milk Rates Hike)  झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. गायीचं 1 लिटर दूध गोकुळने 3 रुपयांनी वाढवलं आहे. तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपयांची वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे संघामार्फत दिनांक 06-12- 2022 पासून (दिनांक 05- 12 -2022 च्या मध्यरात्रीपासून) मुंबई शहर व उपनगरे, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्हयामध्ये वितरीत होणाऱ्या गोकुळ दुधाच्या ग्राहक किंमतीत नाईलाजास्तव वाढ करण्यात येत असून, सदरचे सुधारीत दर खालीलप्रमाणे राहतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे गोकूळ कडून कळवण्यात आले आहे. नक्की वाचा: Gokul Milk Price Hike: गोकुळ दूध महागले; गाई, म्हशींच्या दुधाची खरेदी दरही वाढले, उत्पादक खूश .

दरम्यान गोकुळच्या फुल क्रिम दुधाच्या ग्राहक दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.