Goa Politics Congress BJP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्य बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेला राजकीय धुरळा अद्याप खाली बसायचा आहे. तोवरच महाराष्ट्राला लागूनच असलेले राज्य गोव्यातही राजकीय (Goa Politics) उलथापालत होण्याची शक्यता आहे. गोवा (Goa) राज्यातही महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे पॅटर्न (Eknath Shinde Pattern) पहायला मिळण्याची शक्यता आहे. गोवा काँग्रेसमधील 11 पैकी जवळपास 8 आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, काँग्रेस पक्षातील हे सर्व आमदार आजच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat), विरोधी पक्षनेते माइकल लोबो (Michael Lobo) आणि काँग्रेसचे इतर काही आमदार भजापच्या केंद्रीय नेतृत्वासोबत लवकरच भगवा रंग धारण करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार आणि भाजपचे शिर्ष नेतृत्व यांच्यात वाटाघाटी झाल्या असून आता केवळ पक्षप्रवेशासाठी वेळनिश्चीती बाकी असल्याचे समजते. काँग्रेस गटाकडून कोणत्याही विशेष पद अथवा अधिकारांबाबत कोणताही शब्द दिला-घेतला नाही. (हेही वाचा, Eknath Shinde At Goa Hotel: शपथ घेतल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला रवाना, हॉटेलमधील आमदारांकडून जल्लोशात स्वागत)

दिंगबर कामत आणि मायकेल लोबो या दोघांनीही ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. परंतू, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने काँग्रेसच्या या आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.

गोवा विधानसभा पक्षीय बलाबल

काँग्रेस-11

भाजप-20

एमजीपी-2

अपक्ष-3

एकूण सदस्य संख्या-40

दरम्यान, गोव्यात घडलेली ही पहिलीच घटना नाही. या आधीही गोव्यात अशा प्रकारचे काँग्रेस आमदारांनी पक्षांतर केले आहे. 2019 मध्ये विरोधी पक्षनेता चंद्रकांत बाबू कावळेकर यांनी काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे.