नांदेड: प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या कारणावरून प्रेयसीने केली प्रियकराची हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

प्रेमसंबंधास नकार दिल्याने नांदेडमध्ये (Nanded) प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेड शहरातील आंबेडकर नगर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेने भाऊ आणि मित्रांच्या मदतीने प्रियकराच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आकाश लोकरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश लोकरे हा विवाहित असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या आंबेडकर नगरात 12 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली. आकाश लोकरे याचे त्याच परिसरात राहणा-या रोहिणी थोरातसोबत प्रेमसंबंध होते. आकाशची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असताना आकाश आणि रोहिणी यांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यामुळे यादरम्यान आरोपी रोहिणीने आकाशला पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर असा वारंवार तगादा लावला. मात्र आकाश या गोष्टीला कंटाळून तिच्याशी बोलणे सोडून दिले.हेदेखील वाचा- जळगाव: तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

हाच राग मनात ठेवून रोहिणीने आकाशला 12 फेब्रुवारीला घराबाहेर बोलावले. सुरुवातीला त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यातून तो बचावल्याने रोहिणीने भाऊ आणि मित्रांच्या मदतीने चाकू आणि तलवारीने मारहाण करून त्याची हत्या केली.

या घटनेनंतर मृत आकाश लोकरेच्या आईच्या फिर्यादीवरुन रोहिणी थोरात, प्रशांत थोरात, सतीश हाटकर, सुमीत हाटकर या चार जणांवर 302 कलमान्वये शिवाजीनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईत जुन्या प्रेमसंबंधातून एका तरूणाने विवाहित महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) केईएम (KEM Hospital) रुग्णालयाच्या परिसरात रविवारी (14 फेब्रुवारी) दुपारी घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली होती.