प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई: घाटकोपर (Ghatkopar) स्थानकातील तीन पादचारी पुल दुरुस्तीसाठी पुढील आठवड्यापासून बंद ठेण्यात येणार आहे. तर घाटकोपर स्थानक हे मध्य रेल्वे आणि मेट्रोने जोडले असल्याने पुल दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना अधिकच त्रास प्रवाशांना होणार आहे.

कल्याण दिशेकडेली आणि सीएसएमटी दिशेकडील असणारा घाटकोपरमधील पादचारी पुल दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच नायगाव येथील नवीन पुल प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला असून या स्थानकातील जीर्ण झालेला पुल पश्चिम रेल्वेकडून 13 एप्रिल पासून बंद ठेवण्यात येणार आहे. तर घाटकोपर स्थानकात तीन पादचारी पुल असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आणि गर्दी दिसून येते. परंतु सीएसएमटी पुल दुर्घटनेनंतर आता प्रशासनाने पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.(हेही वाचा-मुंबई: सीएसएमटी येथे घडलेल्या पुल दुर्घटनेत जखमी झालेल्या 57 वर्षाच्या वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू)

घाटकोपर स्थानकातील पुलाच्या पायऱ्यांची पुर्नबांधणीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील पुलाच्या पायऱ्यांचे काम 18 एप्रिल ते 4 मे पर्यंत सुरु राहणार आहे.तर सीएसएमटी दिशेकडील पूल 17 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. तसेच नायगाव येथील नवीन पुल उभारणी केल्यानंतर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरील जुन्या पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेला जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ते बंद ठेवण्यात येणार आहे.