Gautami Patil

Gautami Patil: गौतमी पाटील हिच्या नवी मुंबईतच्या कार्यक्रमात तरुणांनी धिंगाणा घातल्याचे चर्चेत आले आहे. काल तीच्या कार्यक्रमात तरुणांनी तुफान गर्दी केली होती. पंरतु कार्यक्रमात एक साप घुसल्याने मोठा गोंधळ उडाला होता अशी माहिती मराठी वृत्तवाहिनींनी दिली. कमी वेळातच गौतमी पाटील राज्यात लोकप्रिय झाली, तीच्या कार्यक्रमासाठी तरूण मंडळी नेहमीच गर्दी करतात. अनेक कार्यक्रमात तरुणांचा धिंगाणा पाहून पोलिसही वैगातले आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमात काही प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

गौतमीच्या कार्यक्रमात साप पाहून प्रेक्षकांचा गोंधळ उडाला. घटनास्थळी एका सर्पमित्राने सापाला पडकले. नवी मुंबईतील कामोठे परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं. राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. उत्साही प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

गौतमीच्या कार्यक्रमामुळे गोंधळ होत असल्याने काही ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. काहींनी या घटनेला नाराजी व्यक्त केली आहे.