Gautami Patil In Satara: आनंदाच्या भरात लोक काय करतीलयाचा काहीच नेम नाही. याचाच प्रत्यक सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी (Gautami Patil at Khojewadi) गावकऱ्यांना आला. होय, या गावात एका बापाने आपल्या पाच वर्षे वयाच्या मुलाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी बापाने चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) हिचाच कार्यक्रम ठेवला आहे. पाच वर्षाच्या त्या कोवळ्या जीवाला आपल्या वाढदिवसानिमित्त काय सुरु आहे याची निटशी कल्पनाही नसेल. पण, या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीची मात्र चांगलीच करमणूक झाली.
गौतमी पाटील येणार म्हटल्यावर खोजेवाडी आणि पंचक्रोशीतील उत्साही नागरिकांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. गौतमी पाटील हिचे चाहते आणि गौतमी पाटील हिचा डान्स नेमका आहे तरी काय याची उत्सुकता असलेल्या मंडळींनी कार्यक्रमाला जोरदार उपस्थिती दर्शवली. अर्थात कार्यक्रमापूर्वीच बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला आज जरा सौम्य पद्धतीने नृत्य सादर करण्याची सूचना केली होती. त्यामुळे गौतमीनेही डान्स केला. पण जरा हात आखडता घेऊनच. त्यामुळे तिच्या या कार्यक्रमाची 'विशेष चर्चा' घडली नाही. जी तिच्या इतर कार्यकमांवेळी अधिक घडते. (हेही वाचा, Gautami Patil Dances Video: 'घुंगरु' घेऊन गौतमी पाटील पडद्यावर, पण कोणासोबत? घ्या जाणून)
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम साताऱ्यात या आधीही झाला होता. सातारा येथील अहमदनगर (Ahmednagar) मध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी अतिउत्साही चाहत्यांमुळे भलताच राडा झाला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उत्साहींना आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागलो होता. शिवाय गौतमीला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला ते वेगळेच. गौतमीच्या कार्यक्रमाला होणारी तुफान गर्दी विचारात घेता आयोजकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून गर्दी नियंत्रणासाठी 60 बाऊन्सरही ठेवले होते.
गौतमी पाटील सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. सर्वाधिक चर्चा असते ती तिच्या डन्सची. लावणीच्या नावाखाली ती करत असलेल्या डान्समध्ये ती ज्या प्रकारचे हावभाव करते त्यावर अनेकांचे आक्षेप आहेत. लावणीसम्राज्ञी म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे अशा सुरेखा पुणेकर, छाया खुटेगावकर, यांच्यासह अनेकांनी तिच्या लावणी नामक नृत्यावर आक्षेप घेतला आहे. तरीही खरं सांगायचं तर गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे आजघडीला तरुणांच्या गळ्यातील ताईत. नृत्यात ती करत असलेले हावभाव पाहून अनेक तरुणांचा कलेजा खलास होतो. त्यामुळे महाराष्ट्रातून गौतमीच्या कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. तसेच, तिचे कार्यक्रमांना मोठी गर्दीही होते. गौतमी पाटील हिचे लावणी आणि विविध कार्यक्रमांतील व्हिडिओही जोरदार व्हायरल होतात