Gangster Prasad Pujari News: पाठीमागील 20 वर्षांपासून मुंबई पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून हद्दपार (Gangster Prasad Pujari Deported from China) करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरा तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली आहे. पुजारी याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याव शेवटचा गुन्हा सन 2020 मध्ये दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
दरम्यान, प्रसाद पुजारी याने भारतातून पलायन केले आणि एका चिनी महिलेशी विवाह केला आणि तो तिथेच राहू लागला. मात्र विविध गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या पुजारी याला भारतात आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनी त्याला भारतात आणण्यात गुन्हे शाखेला यश मिळणार आहे. इथे त्याला कायद्याचा सामना करावा लागेल. सततचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आज 20 वर्षांनंतर त्याला कायद्याचा सामना करण्यासाठी मुंबईत परत आणले जाईल.
एक्स पोस्ट
Mumbai Crime Branch deports gangster Prasad Pujari. He will be brought to Mumbai by midnight from China: Mumbai Crime Branch
— ANI (@ANI) March 22, 2024
हद्दपारी म्हणजे काय?
हद्दपार ही एक कायदेशीर संकल्पना आहे. ज्याचा स्थळ, काळ आणि प्रदेशानुसार वेगवेगळा अर्थ असू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर या शब्दाचा अर्थ अधिक व्याप्त आहे. एखाद्या देशाचा नागरिक अन्य एखाद्या देशात बेकायदेशीर राहात असेल किंवा निर्वासीत असताना तो राहात असलेल्या नियम, कायदे आणि ध्येय धोरणाविरोधात त्याचो वर्तन असल्याचे आढळून आले तर सदर देश त्याला हद्दपार करु शकतो आणि त्याच्या मूळ देशात जाण्यास प्रवृत्त करु शकतो. खास करु हद्दपार करण्याचा अधिक संदर्भ एखाद्या व्यक्तीला अशा देशातून जबरदस्तीने काढून टाकण्याच्या कृतीचा संबंधाने येतो. जो त्या देशाचा नागरिक नाही. विशेषत: इमिग्रेशन कायदे किंवा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे. बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणे, व्हिसा ओव्हरस्टे करणे, गंभीर गुन्हे करणे किंवा इमिग्रेशन अटींचे उल्लंघन करणे यासारख्या विविध कारणांमुळे हद्दपारी होऊ शकते. जेव्हा एखाद्याला निर्वासित केले जाते, तेव्हा त्यांना सहसा त्यांच्या मूळ देशात किंवा इतर नियुक्त गंतव्यस्थानावर नेले जाते, अनेकदा इमिग्रेशन अंमलबजावणीसाठी जबाबदार सरकारी अधिकारी कारवाई करतात.
जगभरातील अनेक देशांमध्ये हद्दपारीची कारवाई करण्यात येते. अनेकदा हे नागरिक बेकायदेशीररित्या संबंधित देशात वास्तव्यास असतात. काही वेळा ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. बनावट व्हिसा तयार करुनही ते असा ठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे संबंधित देशांना भाग पडते.