Gajanan Marne (Photo Credits-Twitter)

Pune:  पुणे येथील एक कुख्यात गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी फुलांचा वर्षाव सुद्धा कुख्यात गुंड गजानन मार्ने (Gajanan Marne) याच्यावर केला गेला. ऐवढेच नाही त्याच्या स्वागतासाठी मोठी गर्दी सुद्धा झाल्याचे दिसून आली आणि  50 गाड्यांच्या ताफ्यासह रोड शो सुद्धा झाला. गजानान मार्ने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला. त्यात त्याने सफेद रंगाचे कपडे घातल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याच्या समर्थकांची मोठी गर्दी दिसून येत असून त्याला अभिवादन करताना दिसले आहे. याच कारणास्तव आता पोलिसांकडून मार्ने सोबत 8 समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासह अटक ही करण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन करत गजानन मार्ने याचे जंगी स्वागत केले गेले. त्यासाठी तळोजा तुरुंगापासून ते पुण्यापर्यंत मोठी रॅली काढली गेले. रॅलीत कोरोनाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बहुतांशजणांनी मास्क सुद्धा लावले नव्हते. या व्यतिरिक्त सोशल डिस्टंन्सिंगचा तर बोजवारा उडाल्याचे दिसले. मार्ने जेव्हा पुण्याच्या दिशेने जाण्यास निघाला त्या दरम्यान येणाऱ्या टोल नाक्यांवर त्याच्यासह अन्य गाड्या सुद्धा थांबल्या नाहीत. तसेच टोलचे पैसे सुद्धा दिले नाहीत.(Mumbai Murder: चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू)

Tweet:

पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मीडियाशी बातचीत करताना असे म्हटले की, या रोड शो चे चित्रिकरण करण्यासाठी कोणत्याही परवानगीशिवायक ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला गेला. पोलिसांकडून हा ड्रोन जप्त केला आहे. गजानन आणि त्याच्या काही समर्थकांच्या विरोधात पोलिसांनी आयपीसी कलम 188,143,273 आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tweet:

तर गजानन मार्ने हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. तो एका हत्येप्रकरणी तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत होता. पण आता न्यायालयाने सदोषी ठरवले आहे. असे सांगितले जात आहे की, गजानन मार्ने याने पिंपर चिंचवड मध्ये राहणाऱ्या अमन बादे आणि पप्पू गावडे यांची हत्या केली होती. हे दोघेसुद्धा अपराधी होते आणि ते गजानन मार्ने याच्या विरोधात काम करत होते. या हत्याकांडनंतर शहरात गँगवॉरची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी गजानन मार्ने याला अटक केली होती. त्यानंतर तो तळोजा तुरुंगात बंद होता. या प्रकरणी सातत्याने सुनावणी पार पडत होती आणि नंतर कोर्टाने पुरेसे पुरावे नसल्याने गजानन मार्ने याला तुरुंगातून सोडून दिले.