Arun Gawli | Facebook

जन्मठेपीची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अरूण गवळी (Arun Gawli) याने बॉम्बे हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये (Nagpur bench of Bombay High Court ) मुदतपूर्व सुटकेसाठी (Premature Release) अर्ज दाखल केला आहे. गवळी कडून writ petition दाखल करून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जुन्या आदेशामध्ये दिलेल्या सोयीच्या आधारे हा अर्ज केला आहे. यामध्ये 14 वर्ष जेल भोगलेल्यांना, वयाची 65 वर्ष ओलांडलेल्यांना जेल मधून सुटका मिळू शकते. अरूण गवळीने आपण वयाची सत्तरी पार केली आहे. मे 2008 पासून आपण तुरूंगवास भोगत असल्याचेही नमूद केले आहे.

2006 मध्ये महाराष्ट्र शासनाने जारी नोटिफिकेशन मध्ये 14 वर्षांची शिक्षा भोगलेल्यांना सुटका मिळू शकते अशा आशयाचं एक नोटिफिकेशन 20 जानेवारी 2006 ला जारी केले आहे. याचा फायदा घेत वयाचं आणि आजारपणाचं कारण देत अरूण गवळी जेलबाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

मुंबईच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या मोहिली व्हिलेज मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची राहत्या घरात गोळ्या झाडून 4 जणांनी हत्या केली होती. या प्रकरणी अरूण गवळी अटकेमध्ये आहे. सदाशिव सुर्वे, साहेबराव भिंताडे यांचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्याशी काही वाद होते. त्यामुळेच या दोघांनी जामसांडेकर यांना कायमचं संपवण्याचा कट रचला. हा कट अरूण गवळीच्या इशार्‍यावरून पूर्णत्त्वास नेण्यात आल्याचं पुढे स्पष्ट झालं. यासाठी 30 लाखाची सुपारी देण्यात आली होती. नक्की वाचा: अरुण गवळीची कन्या योगिता गवळी व अभिनेता अक्षय वाघमारे अडकले विवाह बंधनात; लॉक डाऊनमध्येही थाटामाटात साजरा झाला सोहळा (See Photos) .

अरूण गवळीला जेव्हा अटक झाली तेव्हा तो भायखळा विधानसभेचा आमदार होता. त्यावेळी पोलिसांनी सबळ पुरावे सादर करून गवळीला अटक केली होती. 2008 पासून तुरूंगात असलेल्या अरूण गवळीला नंतर विविध कारणांसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते. पण आता त्याने मुदतपूर्व कायमच्या सुटकेसाठी कोर्टात धाव घेतली आहे.