
Mumbai: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील बँडस्टँड (Bandstand) भागात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या बॉयफ्रेण्ड आणि दोन जणांना बेड्या घालण्यात आल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, पीडिता आपला बॉयफ्रेण्ड आणि दोन मित्रांसह वांद्रे पश्चिममधील समुद्र किनारी असलेल्या बँडस्टँड भागात फिरायला गेली होती. या तिघांनी तरुणीवर बँडस्टँड भागात समुद्राजवळ तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे तीन आरोपी आणि पीडिता मानखुर्द परिसरातील रहिवासी आहेत. गेल्या आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली होती.
प्राप्त माहितीनुसार, पीडितेने घरी गेल्यावर आपल्या बहिणीला पोटात दुखत असल्याचे सांगितले. पीडितेच्या बहिणीने तिला यासंदर्भात विचारलं असता तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याच सांगितलं. त्यानंतर बहिणीने पीडितेला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तक्रार नोंदवली. (वाचा - Nagpur: कोरोना बरा करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 'नागोबा बाबा'ला अटक, नागपूर येथील घटना)
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हा गुन्हा पुन्हा वांद्रा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.