Ganeshotsav 2021: गणेशोत्सावरील निर्बंध उठवण्याची मागणी अन्यथा माहापालिकेच्या मुख्यालयासमोर महाआरतीचा इशारा
Image For Representation (Photo Credits-Facebook)

Ganeshotsav 2021:  राज्यात अद्याप कोरोनाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने दोन महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी नुकतीच नियमावली आणि गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. मात्र राज्य सरकारच्या गाइडलाइन्सवर बहुतांश जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता ठाणे महापलिकेला सुद्धा गणेशोत्सावरुन आव्हान दिले आहे. त्यानुसार गणेशोत्सवावरील निर्बंध उठवा अथवा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच महाआरती करु असा इशारा ठाणे गणेशोत्सव समितीकडून दिला गेला आहे.(Ganeshotsav 2020: BMC कडून घरगुती गणेशोत्सव साठी नियमावली जारी; श्रींच्या आगमन, विर्सजनाला केवळ 5 जणांना मुभा)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या गाइडलाइन्सवर पुर्नविचार करावा असे म्हटले जात आहे. त्यामुळे यामवर कोणताही विचार न केल्यास किंवा असे न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा ठाणे गणेशोत्सव समितीकडून दिला गेला आहे. गाइडलाइन्समुळे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नियमात थोडी शिथीलता आणावी असे ही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यंत साधेपणाने यंदा सुद्धा गणेशोत्सव साजरा करावा असे सांगण्यात आले आहे. नव्या गाइडलाइन्सनुसार, गणपीतीच्या मुर्तींची उंची, मंडपामध्ये होणारी गर्दी, देखावा यासह अन्य काही गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता यावर पुन्हा एकदा विचार करावा असे ही गणेशोत्सव मंडळांकडून बोलले जात आहे. (Ganeshotsav 2021: 'गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, मार्गदर्शक सूचनांचे पालन करा'- ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आवाहन)

तर यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट दिवशी आहे. त्यादिवशी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली जाईल मात्र यंदा कोरोना संकट पाहता नागरिकांनी हा सण साधेपणाने साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई मध्ये कोविड 19 ची स्थिती पाहता नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर Epidemic Act 1897, the Disaster Management Act, 2005 आणि इंडियन पीनल कोड नुसार उचित कारवाई केली जाईल असा इशारा देखील पालिकेकडून देण्यात आला आहे.