
Ganeshotsav 2021: देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासह लस घेणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये या कारणास्तव घेण्यात आला आहे. परंतु अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह उपनगरातील मंडळी कोकणात जातात. मात्र कोकणात जायचे असेल तर कोरोनाच्या विरोधातील लसींचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. याच अटींना आता रेल्वे प्रवाशी संघाने विरोध दर्शवला असून या नियमांत मुभा न दिल्यास येत्या 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा ही इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अचानक कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्यानंतर राज्य सरकारने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या. त्यानुसार दोन डोस किंवा आरटीपीआर चाचणी करणे अनिवार्य असणार असल्याचे त्यामध्ये स्पष्ट केले. परंतु गणेशोत्सवावेळी ट्रेनचे तिकिट मिळत नाही म्हणून बहुतांश जणांनी तीन महिन्यांपूर्वीच त्याचे बुकिंग केले आहे. अशातच आता नव्या गाइडलाइन्समुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत कोकण रेल्वे प्रवाशी संघाने याचा विरोध केला आहे.(ST कर्मचाऱ्यांना दिलास; महामंडळाला वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरित)
कोकण रेल्वे प्रवाशी संघाने पुढे असे ही म्हटले आहे की, येत्या 5 सप्टेंबर पर्यंत या नियमांत सरकारने मुभा द्यावी. कारण आरटीपीसीआर आणि लसीकरण झालेल्यांनाच प्रवासासाठी परवानगी असणार असल्याने कोकणात जाणाऱ्या नागरिकांनांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे नियमात शिथिलता आणावी अशी मागणी करण्यात आली आहे.(Important Decision of MVA Government: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धडाकेबाज निर्णय, मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदली)
दुसऱ्या बाजूला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे स्पष्ट केले आहे. त्यांना नव्या गाइडलाइन्सच्या अंतर्गत कोणताही सूट दिली जाणार नाही हे सुद्धा टोपे यांनी म्हटले आहे. कोविड19 च्या निर्बंधाबद्दल विचार करुन काही निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेले असावेत.