मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या 300 अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी फेरबदल्या ( Reshuffle Of Mantralaya Officials) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फेरबदल्यांमध्ये सहाय्यक सेक्शन ऑफिसर ते सेक्शन ऑफिसर, सेक्शन ऑफिसर ते अंडर सेक्रेटरी आणि अशा प्रकारे उपसचिव आणि सहसचिव अशी पदोन्नती समाविष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे पाठीमागील काही वर्षांचा इतिहास पाहता पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळातही अशा प्रकारचा निर्णय झाला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय घेतला आहे.
मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत होते. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी एकाच विभागात काम करुन ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही वरचढ ठरले होते. गेल्या काही वर्षांमध्ये या अधिकाऱ्यांचे वजन इतके वाढले होते की, मंत्रिमंडळातील मंत्रीही त्यांना बदलू शकले नव्हते. त्यामुळे सरकार कोणतेही असो. या अधिकाऱ्यांना फरक पडत नव्हता. सरकार बदलले तरी अधिकारी कायम राहात होते. राज्य सरकारच्या या बदलीच्या निर्णयाला प्रशासकीय सेवेतील नोकरदार मंडळींकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याशी बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांचे भाष्य)
राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहाय्याने या बदल्या केल्या आहेत. गेली अनेक वर्षे एकाच पोस्टवर तळ ठोकून बसल्याने हे अधिकारी डोईजड झाले होते. या अधिकाऱ्यांना हलविण्याचा निर्णय पृथ्विराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही झाला होता. परंतू, त्याला यश आले नव्हते. नोकरशाहीच्या कामगिरीवर सरकारची कामगिरी ठरण्याल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे हा निर्णय प्रशासकिय असला तरी विद्यमान सरकारसाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. त्याचे पडसाद कसे उमटतात याबबत नजिकच्या दिसू शकते.