मुंबईची ओळख म्हणजेच गणेशोत्सव (Ganeshotsav) यंदा कोरोनामुळे होणार की नाही याची चिंता गणेश भक्त आणि मंडळांना सतावत असताना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने एक काहीसा दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोरोना (Coronavirus) साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरच्या आधीच देशातून पळवून लावण्याचा प्रयत्न आहे मात्र जर कोरोनाचे संकट टळले नाही तर गणेशोत्सव हा दरवर्षीच्या तुलनेत अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे. तशी मानसिक तयारी आतापासूनच करावी असा सल्ला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर (Naresh Dahibavkar) यांनी अगोदरच दिला आहे. मुंबईचा राजा: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा वर्गणी न घेण्याचा निर्णय
कोरोना मुळे मुंबईत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, आज घडीला कोरोनाचे तब्बल 13 हजार 739 रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती लक्षात मुंबईतील गणेशोत्सव साजरा करण्यावर टांगती तलवार आहे. याबाबात अनेक गणेशोत्सव मंडळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडे वारंवार विचारणा करत आहेत, या प्रश्नांना लक्षात घेता या समितीने काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. यावेळी मुंबईवर ओढवलेले संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून, गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेत भाविकांसह, कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. COVID19 मुळे मुंबईत खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे की..? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
यापूर्वीदेखील मुंबईतील गणेशोत्सवाने अनेक कठीण प्रसंगांमध्ये सामाजिक भान जपले आहे. अतिवृष्टी, 26 जुलै, अशा सर्व प्रसंगी गणेश मंडळांनी पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य आततायी अपेक्षित आहे. कोरोनामुळे मागील काही दिवसांत पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. अशावेळी गणेशोत्सवात गर्दी टाळून हातभार लावावा. अनेक वर्षांपूर्वी राज्यात सर्वत्र प्लेगची साथ असताना,लोकांनी अक्षरशः घरातील गणरायाच्या छोट्या मूर्ती, फोटो पुजल्या होत्या यावेळीही असेच संकट आहे त्यामुळे साधेपणाने सण साजरा करून सहकार्य करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आल्यास यंदाही नियमांचे पालन करीत निश्चितच सण थाटामाटात साजरा करू, असा विश्वासही नरेश दहिबावकर त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे लॉक डाऊन असल्याने यंदा मे महिना अर्धा संपत आला असतानाही मुंबईतील गणपती बनवणाऱ्या कार्यशाळा थंड पडल्या आहेत.