जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची (Coronavirus In Mumbai)  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ताज्या अपडेटनुसार मुंबई मध्ये मागील 24 तासात कोविड 19 (COVID19 ) चे 875 नवे रुग्ण आढळले होते. यानुसार एकट्या मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजार 564 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 508 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3004 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या परिस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नियंत्रण कामावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या टीकांना मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट च्या माध्यमातून उत्तर दिले आहे. मुंबईत कोरोनामुळे खरंच इतकी वाईट परिस्थिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्यासाठी आखलेला हा कट आहे असा संंतप्त सवाल आव्हाड यांनी ट्विट मध्ये केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावर मात केल्यावर पुन्हा ट्विटरवर सक्रिय होऊन केलेले हे ट्विट सध्या चर्चेत आहे. Coronavirus: जितेंद्र आव्हाड यांची COVID-19 विषाणूवर यशस्वी मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

जितेंद्र आव्हाड यांनी कोणाचेही नाव घेतले नसताना भाजप वर अप्रत्यक्ष हल्ला केल्याचे समजतेय. “आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय. मुंबईचा लचका तोंडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे,” असं आव्हाड यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. Coronavirus:  मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सहित तुमच्या जिल्ह्यात किती COVID19 रुग्ण आहेत, पहा

जितेंद्र आव्हाड ट्विट

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परिणामी मागील महिनाभर ते ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हते, परिणामी वेळोवेळी राजकीय परिस्थितींवर त्यांची टिपण्णी त्यांचे चाहते मिस करत होते. रविवारी १० मे रोजी आव्हाड ठणठणीत होऊन रुग्णालयातून घरी परतले आणि त्यांनी या ट्विटच्या रूपातून पुन्हा दणदणीत एंट्री केली आहे.