गडचिरोली: नक्षलवाद्यांसोबत चकमकीत पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने व सी60 शिपाई किशोर आत्राम शहीद; अन्य तीन पोलिस जखमी
Representational Image | (Photo Credit: PTI)

गडचिरोली (Gadchiroli) येथील भामरागड परिसरात आज, 17 मे रोजी नक्षलवादी (Naxalites) आणि पोलिसांंमध्ये (Gadchiroli Police) चकमक झाली, या मध्ये दुर्दैवाने दोन पोलिस  शहीद झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजतेय. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंग स्फोटात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (30) व सी 60 पथकाचे शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. होनमने यांना नुकतेच पोलीस महानिरीक्षक पदकाने गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या तर्फे याविषयी पुष्टी करण्यात आली. नक्षलवाद विरुद्ध कारवाई करत असताना या भागातील नक्षल वाद्यांनी सुरुवातीला भूसुरुंग सॉफ्ट घडवून आणला व त्यांनतर पोलिसांवर गोळीबार सुद्धा केला होता.

प्राप्त माहितीनुसार, सदर घटना ही भामरागड येथील पोयारकोटी-कोपरशी या भागातील जंगली परिसरात घडली. सध्या ही परिस्थिती गडचिरोली पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवादी ठार झाले असावेत अशी शक्यता गडचिरोली पोलीस दलाने व्यक्त केली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांनी हिंसा सुरु केली आहे. 2 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला ठार केले होते तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी 20 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.