Gadchiroli News: धानोरा तालुक्यातून पोलीसांनी ३ आरोपींकडून २० लाख ९८ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. मुरुमगाव पोलीसांनी तिन्ही आरोपीला अटक केले आहे. तिन्ही आरोपीकडून 138 किलो 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.त्याच्यावर विरुध्दात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते छत्तीसगड राज्यातून गांजाडी तस्करी करत होते. पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारावर ही कारवाई केली आहे.
छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. मुरुमगाव पोलीसांनी सापळ रचून गाड्या तपसाणी केल्या. गाडीतील तीन जणांकडे गांजा असल्याचे पोलीसांना समजले. पोलीसांनी बस स्थानकावर कारला ताब्यात घेतलं. MH-04-CM-2515 या क्रंमाकाच्या होंडा सिटी कारमधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली होती.
कारमध्ये एकूण 138 किलो 580 ग्रॅम वजनाचा गांजा (अंमली पदार्थ) सापडला, या गांजाची अंदाजे किंमत 13 लाख 85 हजार 800 रुपये आहे. गांजा तस्करी करताना वापरण्यात आलेली चारचाकी, सिल्व्हर रंगाची होंडा सिटी कार जवळपास 7 लाख रुपयांची आहे. तसेच, दोन आरोपींकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत 13 हजार रुपये आहे, असा एकूण किंमत 20 लाख 98 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे जमा करण्यात आला आहे.
पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा तस्करी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिन्ही आरोपी मुंबईचे रहिवासी असल्याचे माहिती मिळाली आहे. उमर फैय्याज अहमद शेख, राकेश राजु वरपेटी, शहबाज सरवर खान असं या तिन्ही आरोपींचे नाव आहे.