चंद्रपूर: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का; गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकसआघाडी विजयी, भाजपला केवळ 2 जागा
Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

Gadchandur Municipal Council Election Result 2020: जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवदी काँग्रेस (NCP) , काँग्रेस (Congress) पक्ष प्रणित महावकासआघाडीकडून भाजपला धोबीपछाड मिळाल्यानंतर विविध ठिकाणी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतही भाजपला पराभवाचा सामनाच करावा लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येत असलेल्या गडचांदूर नगर परिषद (Gadchandur Municipal Council) निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत एकूण 17 जागांपैकी भाजपला केवळ 2 जागांवर यश मिळाले. उर्वरीत सर्व जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यात एक जागा शेतकरी संघटनेलाही मिळाली.

गडचांदूर नगरपरिषद निवडणूक निकाल 2020

  • काँग्रेस - 5
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 4
  • शिवसेना - 5
  • भाजप - 2
  • शेतकरी संघटना - 1

    एकूण - 17

राज्यात महाविकसआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच गडचांदूर नगरपरिषद निवडणूक लागली होती. महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यामुळे भाजपला अत्यंत नाट्यपूर्णरित्या सत्तेबाहेर जावे लागले आहे. सत्तेतून बाहेर बसावे लागल्याने हातातोंडाशी आलेला घास दूर गेल्याची भावना आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजप आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. गडचांदूर नगरपरिषद निवडणुकही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. पण, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना भाजपला केवळ 2 जागाच मिळाल्या आहेत. (हेही वाचा, रत्नागिरी: लांजा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना बहुमताने विजयी, भाजपला धक्का, मनोहर बाईत यांची नगराध्यक्षपदी निवड)

दरम्यान, सार्वजत्रिक निवडणुकीसोबतच इथे नगराध्यक्ष पदाची निवडणुकही पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सविता टेकाम विजयी झाल्या. टेकाम यांना 1104 इतकी मते मिळाली. या आधी नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. ते आपल्याकडे खेचून घेणे या निवडणुकीत काँग्रेसला शक्य झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना सोबत नसल्याने भाजप एकटी लढत होती.