Friendship Day च्या दिवशी पावसात अडकलेल्या जनतेला मुंबई पोलिसांचा आधार, मित्र बनून पुढे केला मदतीचा हात
Mumbai Police Helping Citizens (Photo Credits: Twitter)

अडीअडचणीत आपल्या मदतीसाठी धावून येतो तोच खरा मित्र अशी मैत्रीची साधारण व्याख्या सर्वज्ञात आहे. मुंबईकरांच्या अडचणीत त्यांना नेहमीच मदत करण्यासाठी हजर असलेले मुंबई पोलीस (Mumbai Police) म्हणजे या व्याख्येचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवेत. आज फ्रेंडशिप डे (Friendship Day 2019) च्या दिवशी सुद्धा याची प्रचिती पाहायला मिळाली. मागींल दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पोलिसांनी आजही मदतीचा हात दिला आहे. पावसाच्या माऱ्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून मुंबईकरांचे हाल झाले आहेत, अशा वेळी पोलिसांनी सर्व मदत पुरवत नागरिकांची सुटका करण्याचे काम हाती घेतले आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत मुंबईकरांनो आम्ही तुमच्या सोबत आहोत असा दिलासा देणारी एक पोस्ट लिहिली आहे. या ट्विट मध्ये ' खरा मित्र हा पाऊस वारा न बघता मदतीसाठी नेहमी तयार असतो, मुंबईकरांना मदतीसाठी आम्ही वारंवार हे दाखवून देऊ' असा विश्वाशी पोलिसांनी दर्शवला आहे. LIVE Maharashtra Monsoon 2019: मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य-हार्बर रेल्वे सेवा ठप्प; सकल भागातही साचले पाणी

 

मुंबई पोलीस ट्विट

या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकत असाल की, अक्षरशः कंबरेपर्यंत पाण्यात आपल्या जीवाची पर्वा ना करता नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मुंबई पोलीस कार्यरत आहेत. कुठे अडकलेल्या नागरिकांना हात देत तर कुठे गाडीच्या चाकाला ढकलत पोलीस मदत करत आहेत. आपत्तीच्या काळात आपली जबाबदारी ओळखून दिवसरात्र झटणाऱ्या या खऱ्या मित्रांना मनपूर्वक सलाम!