मुंबई, ठाणे व उपनगरात मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. कल्याण ते करजत स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणा पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी निसदां पुढचे दोन दिवस लागणार असल्याने तोपर्यंत ही वाहतूक बंदच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज रविवार असल्याने चाकरमानी मुंबईकरांची रेल्वेला फार गर्दी नव्हती पण उद्या एन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामाला जाताना हाल होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
Maharashtra Monsoon 2019: कल्याण- कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक पुढील 2 दिवस ठप्प राहण्याची शक्यता
Mumbai Monsoon 2019: मुंबई शहर आणि उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल (3 ऑगस्ट 2019) सुरु झालेला मुसळधार पाऊस अल्पशा विश्रांतीनंतर आजही (4 ऑगस्ट 2019) कायम आहे. संततधार कोसणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे सेवा (Central Railway Mumbai) आणि हार्बर रेल्वे सेवा (Harbour Railway) पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहरात सकल भागात अनेक ठिकाणी पाणीच साजले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका (BMC), मुंबई पोलीस (Mumbai Polic) आणि सरकारकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घराबाहेर पडणे टाळा, असे अवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबई शहर उपनगरांत सध्या काय स्थिती
मुंबई शहरात सकल भागात पाणी साचले. चुनाभट्टी येथे रुळावर साचले पाणी. हार्बर सेवा विस्कळीत. ठाणे, कर्जत, बदलापूर,कल्याणमध्येही पावसाची संततधार कायम. बोरघाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेमार्ग वाहतूक ठप्प. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे सुरू असल्याची मध्य रेल्वेची ट्विटरवरून माहिती. परंतू, प्रत्यक्षात रेल्वे ठप्प. प्रवाशांची फलटांवर गर्दी.
मध्य रेल्वे ट्विट
लोकल वाहतूक अपडेट ०८.०० वा. pic.twitter.com/wo7OJpsqZW
— Central Railway (@Central_Railway) August 4, 2019
मेगाब्लॉक रद्द, तरीही रेल्वे ठप्प
मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द केला असला तरी, रेल्वे सेवा मात्र ठप्पच आहे. मेगाब्लॉक काळात रेल्वे सेवा अत्यंत मंद गतीने सरु असते. नेहमीच्या तूलनेत दैनंदिन वेळापत्रानुसार रेल्वे धावत नाहीत. मात्र, आज मेगाब्लॉक रद्द करुनही रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाणे, कळवा, सायन, अशा अनेक रेल्वे स्टेशनवर पावसामुळे पाणीच पाणी साचले आहे. हे पाणीच रेल्वे सेवा ठप्प होण्यास कारण ठरले आहे.
मध्य रेल्वे ट्वीट
Trains Update-5
due to heavy rains, water logging/boulder fallen in southeast ghat... pic.twitter.com/EA2S8NPWwh
— Central Railway (@Central_Railway) August 4, 2019
मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगाल जोर पकडला
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगाल जोर पकडला. अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, अंधेरी, विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग परिसराने पावसाने अधिक जोर पकडला आहे. तर, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश स्थिती आहे. तर, पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. (हेही वाचा, मुंबई: पाऊस, समुद्र भरतीमुळे अपत्कालीन स्थिती उद्भवल्यास BMC कडे संपर्क साधा ; करा 1996 आणि 101 या टोल फ्री क्रमांवर कॉल)
एएनआय ट्विट
Central Railways: Due to very very intense rainfall throughout, there is accumulation of water in different sections of Central Railway Suburban section of Mumbai. We are reviewing situation every 30 minutes. https://t.co/5vwUcnF8Eo
— ANI (@ANI) August 4, 2019
हवामान खात्याने येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, राज्यभरातील अनेक ठिकाणी समाधानकारक म्हणावा असा पाऊस पडत असला तरी, राज्यातील काही भाग मात्र अद्यापही कोरडाठाक आहे. त्यामुळे एका बाजूला मुसळधार पाऊस तर दुसऱ्या बाजूला दुष्काळसदृश्य स्थिती असे चित्र आहे.