
Youth Dies After Drowning in Swimming Pool: नागपूर (Nagpur) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. बुधवारी रात्री नागपूरमधील वाठोडा भागात असलेल्या एका फार्महाऊसमधील स्विमिंग पूल (Farmhouse Swimming Pool) मध्ये बुडून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे नाव प्रांजल नितीन रावले असे आहे. बुधवारी रात्री 2.00 वाजताच्या सुमारास पांढुर्णा गावातील एका फार्महाऊसवर ही घटना घडली, जिथे प्रांजल त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजलला पोहता येत नव्हते. त्याने पार्टी दरम्यान अचानक स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. सुरुवातीला त्याच्या मित्रांना वाटले की तो मस्करी करत आहे, पण लवकरच तो खोल पाण्यात जाऊ लागला. जेव्हा मित्रांना समजले की, तो खरोखरचं पाण्यात बुडत आहे, तेव्हा त्यांनी त्याला कसेतरी बाहेर काढले. त्यानंतर प्रांजलला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा -Girl Drown in Tembhu Dam: रंगपंचमी खेळायला गेलेली 12वीची विद्यार्थिनी टेंभू धरणात बुडाली; खंबाळे बोगद्याजवळ सापडला मृतदेह)
वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल -
वाठोडा पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना अपघाती होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, जेणेकरून अपघात कसा झाला हे स्पष्ट होईल. (हेही वाचा -Boy Drown in Ratnagiri Sea: रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात बुडून पनवेलमधील एकाचा मृत्यू, सुदैवाने दुसरा बचावला)
दुकानाची काच फोडल्याने तरुणाची हत्या -
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत नागपूरमध्ये एका बेकायदेशीर दारू दुकानाची काच फोडल्याप्रकरणी एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकणाचा अधिक तपास करत आहेत.