
महाराष्ट्रामध्ये आज रंगपंचमीचा (Rangpanchami) खेळ साजरा करण्यात आला. पण या आनंदाच्या सणालाही अपघाताचं गालबोट लागलं आहे. मित्र-मैत्रिणीसोबत रंगपंचमी खेळायला गेलेली काही तरूण मुलं धरणात पडली. यामध्ये एक कॉलेजची विद्यार्थिनी असलेली तरूणी वाहून गेली आहे. ही घटना टेंभू धरणामधील (Tembhu Dam) आहे. सांगली (Sangali) मध्ये खंबाळे बोगद्यामध्ये तरूणीचा मृतदेह आढळला आहे. दरम्यान हा प्रकार कसा घडला याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहेत.
सहा जण रंगपंचमी खेळायला गेले होते. मृत तरूणीचं नाव जुही घोरपडे आहे. जुहीने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर तिच्यासोबत घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात धुलिवंदनाला बदलापूर मध्ये उल्हास नदी आणि पुण्यात इंद्रायणी नदी मध्येही अशाच दुर्घटना समोर आल्या होत्या. Happy Rang Panchami 2025 Wishes In Marathi: रंगपंचमी निमित्त Message, WhatsApp Status, Images, Quotes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा रंगाचा सण!
होळीच्या 5 दिवसानंतर रंगपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्र, यूपी, एमपी मध्ये रंगपंचमीला रंग खेळले जातात. लहान मोठे रंगपंचमीला रंग उधळत आनंद साजरा करतात. महाराष्ट्रात रंगपंचमीला पंढरपूर मध्ये विठ्ठल- रूक्मिणीवरही रंग उधळत रंगपंचमी साजरी केली जाते.