
Happy Rang Panchami 2025 Wishes In Marathi: चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा (Rang Panchami 2025) सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात रंगपंचमीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. याला देव पंचमी (Dev Panchami) आणि श्री पंचमी अशा नावांनी देखील ओळखले जाते. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी देव-देवता रंग खेळण्यासाठी पृथ्वीवर येतात. याला देव-देवतांची होळी असेही म्हणतात. मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी देवाला रंग अर्पण केल्याने भक्तांना त्यांच्या देवतेचा आशीर्वाद मिळतो.
रंगपंचमी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. ही तारीख 18 मार्च रोजी रात्री सुरू होईल आणि 20 मार्च रोजी रात्री 12:37 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, रंगपंचमी फक्त 19 मार्च रोजी साजरी केली जाईल. रंगपंचमी निमित्त तुम्ही Message, WhatsApp Status, Images, Quotes द्वारे तुमच्या मित्र-मैत्रिणींना रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊन शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रीटिंग्ज डाऊनलोड करू शकता.
रंगपंचमीच्या मराठी शुभेच्छा -
सुखाच्या सरींनी भिजवू दे आज,
रंग उधळू दे स्वप्नांच्या गगनात.
गुलालासारखं मन नाचू दे,
आनंदाच्या धुंदीत रंगू दे आज!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रंग भिनू देत मनामनात,
हसू पसरू दे गगनात,
ताटात मिष्टान्न असो
वा गोडवा नात्यात,
स्नेहाचा रंग कधीच
उडू नये जीवनात!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाच्या सरींनी भिजवू दे तन,
रंग उधळू दे उंच गगन!
सुख, समृद्धी आणि प्रेमाचा स्पर्श,
असाच दरवळत राहो अखंड हर्ष!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुलालासारखी तुझी आठवण उधळते,
सुखाच्या रंगात मन रंगून निघते.
ही रंगपंचमी तुझ्या आठवणींच्या छायेत,
आनंदाच्या सरींनी मन मोहरून जाते!
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पिवळा रंग आनंदाचा, गुलाबी रंग प्रेमाचा,
निळा रंग शांततेचा, हिरवा रंग समृद्धीचा!
या सुंदर रंगांनी तुझं आयुष्य सजावं,
सुख-समृद्धीचं इंद्रधनुष्य तुला लाभावं!
रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

रंगपंचमीला भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणीला रंग लावले जातात. या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी देवाला गुलाल आणि अबीर अर्पण केले जातात. या दिवशी धार्मिक विधी केले जातात आणि पूजा केली जाते.